esakal | मुलानेच संपविले जन्मदात्याचे आयुष्य
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मद्य प्राशन केल्यानंतर मुलगा व पित्यात वाद झाला. त्यात रागाच्या भरात मुलाने वडिलांना मारहाण करून त्यांचा खून केला.

मुलानेच संपविले जन्मदात्याचे आयुष्य

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : रागाच्या भरात मुलाने जन्मदात्याचे जीवन संपविल्याचे घटना अमरावती येथे घडली. कांडलकर प्लॉट येथे ही घटना घडली. मद्य प्राशन केल्यानंतर मुलगा व पित्यात वाद झाला. त्यात रागाच्या भरात मुलाने वडिलांना मारहाण करून त्यांचा खून केला. खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी ) मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

रामदास सदाशिव पाचकवडे (वय ६०, रा. कांडलकरप्लॉट) असे मृत वृद्धाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी मृत व्यक्तीचा मुलगा भूषण रामदास पाचकवडे (वय ३०) याला अटक केली. बुधवारी सायंकाळी वडील व मुलाने घरातच मद्यप्राशन करून मांसाहारावर ताव मारला. नशेत असताना, पितापुत्रामध्ये वादविवाद सुरू झाला. रागाच्या भरात भूषणने वडिलांना लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली.

वाचा - आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार प्रमोद कदम यांनी केली दमदाटी

खाटेच्या खाली आपटल्याने रामदास यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मुलगा भूषणने पळ काढला. शेजाऱ्यांनी वृद्ध पडून असल्याने त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी रामदास पाचकवडे यांना मृत घोषित केले. खोलापुरीगेट पोलिसांनी प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेऊन चौकशी सुरू केली असता, रामदास यांचा खून केल्याचे उघडकीस आले. मृत व्यक्तीचा भाऊ सुनील सदाशिव पाचकवडे (वय ५७) यांनी तक्रार दिली.

या घटनेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात मारहाण केल्यानंतर अंतर्गत जखमी होऊनच रामदास पाचकवडे यांचा मृत्यू झाल्याने स्पष्ट असल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला.
- अतुल घारपांडे, पोलिस निरीक्षक, खोलापुरीगेट. ठाणे. 

संपादन - नरेश शेळके

loading image
go to top