
यवतमाळ : शासकीय धान्य गोदामातील हमाल पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांचे जवळपास साडेसहा लाख रुपयांचे देयक अडकून आहे. देयक मिळत नसल्याने सदर कंत्राटदाराच्या मुलाने जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास घडली.