मुलगा अडकला मुंबईत अन् ईकडे आईला झाली देवाज्ञा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

यवतमाळ तालुक्यातील रुई (वाई) येथील वच्छला पांडुरंग फुलझेले या आजारी महिलेने उपचाराविना मंगळवारी (ता.१)रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मोठा मुलगा राजू फुलझेले कामानिमित्त मुंबईला राहतो. आई आजारी असल्याचा निरोप मिळाल्यापासून भेटीसाठी आतूर झाला होता. त्यासाठी त्याने नातेवाईकांशी संपर्क देखील साधला होता. मात्र, कोरोनामुळे येता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. आईवर आम्ही रुग्णालयात नेऊन उपचार करतो, ती बरी होईपर्यंत बाहेरचे वातावरण निवळेल त्यानंतर गावी येण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला.

यवतमाळ : आई प्रत्येकाच्या आयुष्यतील सोनेरी पान. तिचा सहवास हवाहवासा वाटतो. आपण रडलो तर ती रडते. आपण हसलो तर ती हसते. तिच्या मायेच्या पदराखाली सुखच सामावलेलं असतं. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला स्थायिक झालेल्या मुलाला आईची अखेरची भेटही घेता आली नाही.

यवतमाळ तालुक्यातील रुई (वाई) येथील वच्छला पांडुरंग फुलझेले या आजारी महिलेने उपचाराविना मंगळवारी (ता.१)रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मोठा मुलगा राजू फुलझेले कामानिमित्त मुंबईला राहतो. आई आजारी असल्याचा निरोप मिळाल्यापासून भेटीसाठी आतूर झाला होता. त्यासाठी त्याने नातेवाईकांशी संपर्क देखील साधला होता. मात्र, कोरोनामुळे येता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. आईवर आम्ही रुग्णालयात नेऊन उपचार करतो, ती बरी होईपर्यंत बाहेरचे वातावरण निवळेल त्यानंतर गावी येण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला.

लॉकडाउनमुळे यवतमाळ येथे येण्या-जाण्याच्या सर्व सुविधा बंद असल्याने रुग्णालयात नेता आले नाही. अखेर आईच्या निधनाचा निरोपच मुलाला मिळाला.आई आपल्याला सोडून गेली तिची भेट झाली पाहिजे, यासाठी रात्रभर घरीच तळमळत राहिला. आपल्या गावी कसे पोहचता येईल, यासाठी फोनाफोनी केली.

सकाळ होताच एका नगरसेवकाच्या मदतीने परवानगीसाठी विरार पोलिस ठाणे गाठले. तेथील अधिकाऱ्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. वाहनांची व्यवस्था करा, आम्ही परवानगी देतो, मात्र, पुढे मार्गात अडचण निर्माण झाल्यास कठीण होईल, अशा प्रकारे समजूत घातली. काही झाले तरी चालेल राजू याने वाहनाचा शोध घेतला. मात्र, तेदेखील मिळू शकले नाही आणि आईचे अंतिम दर्शन घेता आले नाही.

सोशल मीडियावर आठवले स्टाईलची धूम, हे आहे कारण...

अशी वेळ कोणावरही येऊ नये
आई आजारी असल्याचा निरोप मिळाला, तेंव्हापासून गावी येण्याचा सारखा प्रयत्न सुरू आहे. रात्री आई गेल्याचा निरोप मिळाला. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन परवानगीसाठी प्रयत्न केले. तेथील अधिकाऱ्यांनी मार्गात येणाऱ्या अडचणी सांगितल्या. वाहनही मिळू शकले नाही. अशी वेळ कुणावरही येऊ नये, असे वाटते.
- राजू फुलझेले, मुलगा, विरार(मुंबई)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son unable to attend mother"s funeral at yavatmal