
जलालखेडा : कापसाबरोबरच नगदी पीक म्हणून सोयाबीनला शेतकरी पसंती देतात. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. पावसाने साथ दिल्याने उत्पादनही चांगले झाले. सोयाबीनची मळणी होऊन महिन्याभरापूर्वीच बाजारात विकायला आणले. पण, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.