
अमरावती : सोयाबीनने यंदा शेतकरी व खाद्य तेलाचे ग्राहक, अशा दोघांच्याही डोळ्यांत पाणी आणले आहे. शासकीय खरेदीत अटींचा भरमार व खुल्या बाजारात पडते दर, यामुळे शेतकरी त्रस्त असताना सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे.