विशेष बहिणीने बांधली पायाच्या मदतीने भावाला राखी

प्रतीक बारसागडे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नागपुरातील एक बहिण अशीही आहे, जिला जन्मत:च दोन्हीही हात नाही. तरीही तिने पायाच्या मदतीने भावाला राखी बांधून अपंगत्वावर मात केली.

नागपूर : बहिणभावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानल्या जाणारा रक्षाबंधन सण आज (रविवार) देशभर साजरा करण्यात आला. या दिवशी बहिण आपल्या लाडक्‍या भावाच्या हाताला राखी बांधून संकटाच्या क्षणी संरक्षण करण्याचे त्याच्याकडे मागणे मागते. 

नागपुरातील एक बहिण अशीही आहे, जिला जन्मत:च दोन्हीही हात नाही. तरीही तिने पायाच्या मदतीने भावाला राखी बांधून अपंगत्वावर मात केली. श्रीकृष्णनगर येथील बोरकर परिवारातील साची आपला भाऊ निमेषला राखी बांधली आणि रक्षाबंधन साजरा केला. 

Web Title: special sister tie Rakhi to brother

टॅग्स