
बुलडाणा - अजिंठा मार्गावरील पाडळी व पळसखेड दरम्यान सोमवार ४ ऑगस्टच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास भरधाव दुचाकी थेट कावड यात्रेत घुसल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेला युवक बुलडाणा तालुक्यातील करवंड येथील मुकेश गजानन राठोड (वय २५) असल्याची माहिती आहे.