

यवतमाळ : भरधाव बोलेरो वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणासह महिलेचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ बुधवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास घडली.