Gondia Accident : पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Accident News : गोंदिया-बालाघाट मार्गावर रजेगावजवळ वळणावर भरधाव पीकअपने दुचाकीला धडक दिल्याने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी झाले.
रावणवाडी ( जि. गोंदिया) : भरधाव पीकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी दहाच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगावजवळ वळणमार्गावर घडली.