Truck Carrying Solar Panels Collides : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सौर पॅनेल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक
Truck Hits Mini-Truck on NH : राष्ट्रीय महामार्गावर व्याळा-कान्हेरी दरम्यान उभ्या मिनीट्रकला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले.
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या मिनीट्रकला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव ट्रकने धडक दिल्याने मिनीट्रक दुभाजकावर आदळला. यामध्ये मिनीट्रकचा चालक जखमी झाला.