esakal | दुहेरी हत्याकांड बदल्याच्या भावनेतून
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुहेरी हत्याकांड बदल्याच्या भावनेतून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि.नागपूर) : कर्जावर अवाजवी व्याज आकारून आई-वडिलांना केलेल्या मारहाणीची वचपा कढण्यासाठी संजय व बंडू मेश्राम यांचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपी अविनाश मोती सांगोडे (वय 30) व अनिल शंकर सांगोडे ( वय 24, दोघेही रा. गुढरी पंडे) यांना पोलिसांनी पाच तासांत ताब्यात घेतले. दोघांनीही बदल्याच्या भावनेतून खून केल्याची कबुली दिली.
रविवारी पारशिवनी तालुक्‍यातील गुढरी पंडे येथे आरोपी अविनाश याने त्याचा साथीदार अनिल याच्या मदतीने गावातच पाण्याच्या टाकीजवळ संजय मेश्राम याच्या डोक्‍यात बंदुकीने गोळी मारून तर शेतात काम करत असलेल्या बंडू मेश्रामलासुद्धा गोळी घालून संपविले. या घटनेमुळे गावात शांतता पसरली असून दुहेरी हत्याकांडाबाबत कुणीही समोर येऊन बोलायला तयार नव्हते. गावात काहीच झाले नाही, अशी शांतता पसरली होती. घटनेची माहिती परिसरात पसरली असता बघ्यांची गर्दी उसळली होती. आरोपीचे धागेदोरे हाती लागल्याने रामटेक परिसरात नातेवाइकांच्या घरी आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्याच्या आधारे रामटेक येथून पहाटे चारच्या दरम्यान आरोपी अविनाशला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा साथीदार अनिल यालाही अटक केली. त्याच्याकडील बंदूक पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचे शवविच्छेदन नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास काळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश गौहाने, पोलिस शिपाई बादल गिरी, पोलिस शिपाई मुदसस्‌र जमाल, रामटेके, नंदू कोल्हे यांनी पार पाडली.
वडिलाच्या छळणुकीमुळे खून
अविनाश सांगोडे याच्या वडिलला मृत संजय मेश्राम याने काही काळापूर्वी व्याजाने रक्कम दिली होती. मृत मेश्रामने मुद्दलच्या रकमेवर अवाढव्य व्याज आकारले होते. वडिलांनी सांगोडे यांच्या भाऊबंधातली शेतजमीन विकत घेतली होती. पण मेश्राम बापलेकांनी या शेतातून रस्ता न दिल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करून या समस्येचा निपटारा करण्यात आला. परंतु आरोपीच्या वडिलाला बंडू व संजय या बापलेकाने मारहाण केली होती. तसेच अनेक वेळा या बापलेकांनी सांगोडे परिवाराला वेठीस धरून पिळवणूक करत असताना अविनाश हा विनंती करायचा. आरोपीच्या मनात या बापलेकांविषयी शत्रूत्वाची भावना निर्माण झाली. तो मनातल्या मनात या बापलेकाच्या अन्यायाला कंटाळला होता. रविवारी दुपारी या बापलेकाला संपविण्याचा निश्‍चय केला.

loading image
go to top