
अविनाश साबापुरे
यवतमाळ : दहावीचा निकाल लागल्यावर प्रत्यक्ष गुणपत्रिका हाती पडण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागते. पण यंदा महाराष्ट्रातील ११ लाख ७६ हजारांवर विद्यार्थ्यांना निकाल घोषित होताच ‘डिजिलॉकर’मध्ये गुणपत्रिका मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अपार आयडी नोंदविल्यामुळे हा लाभ होणार आहे.