Accident : एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात; १७ मुले आणि चालक जखमी

लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन १७ मुले आणि चालक जखमी झाले आहे.
Accident
Accidentsakal

लोणार - लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन १७ मुले आणि चालक जखमी झाले आहे. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना मेहकर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बीबी येथून एक किलोमीटर अंतरावर मांडवा रोडवर एमएच 40 एक्यू 6258 क्रमांकाच्या चिखली अंढेरा बुलडाणा ही एस टी बस आणि सहकार विद्या मंदिर चे विद्यार्थी शाळेत बीबी येथे घेऊन येत असणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली.

गोकुळाष्टमीनिमित्त मुले विविध वेशभुषा करून सहकार विद्यामंदिरामध्ये वाहनाद्वारे जात होते. दरम्यान मांडवा गावानजीक एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शाळकरी मुलांच्या वाहनाची व एसटी बसची धडक झाली. या अपघातामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुले जखमी झाली असून वाहनाचा चालकही गंभरी जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच बीबी येथील दीपक गुलमोहर यांचे मित्र, सहकारी व ग्रामस्थांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनाद्वारे बीबी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

वाहन चालक मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला मोठ्या प्रयासानंतर वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बीबीचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठले. बसमध्ये नऊ प्रवाशी होते, असे वाहक वनारे यांनी सांगितले. वृत्तलिहीपर्यत पोलिस कार्यवाही सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com