
चिखली : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावकडे परतणाऱ्या एसटी बसचा सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना आज ता. ७ जुलैच्या मध्यरात्री २ वाजे दरम्यान रोजी चिखली-मेहकर फाटा रोडवरील महाबीज समोर घडली. बस क्रमांक एम.एच. ४० वाय ५८३० ही रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.