ST BUS : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सालेकशा तालुक्यात चाळीस गावात एसटी बस फिरकलीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

ST BUS : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सालेकशा तालुक्यात चाळीस गावात एसटी बस फिरकलीच नाही

सालेकसा : महाराष्ट्राच्या सीमेवरील मध्य प्रदेश व छत्तीसगड गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्र व जंगलाने व्यापलेला भाग म्हणून एक ओळख आहे तसेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सालेकसा तालुक्यातील 40 गावात आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सुरू करण्यात आली नाही.

त्यामुळे आजही साडेकरी विद्यार्थी व शासकीय कामानिमित्त मुख्यालय गाठण्याकरिता एसटी बस नसल्यामुळे फार मोठा त्रास व वेळ सुद्धा वाया जात असते याकडे शासन स्तरावरून लोकप्रतिनिधी सुद्धा झोपेच् सोंग करून आजवरही सालेकसा तालुक्यात परिवहन महामंडळाची एसटी बस सुरू व्हावा याकरिता कोणत्याही जनप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही एक वर्षांपूर्वी साले कसा तालुक्यातील काही,पत्रकार मंडळींनी गोंदिया येथे आगार प्रमुख यांना निवेदन दिले होते व निवेदनात बोदलबोडी ते आमगाव तसेच सालेकसा ते देवरी मार्गावर बस सुरू करण्यात यावे परंतु आजही परिवहन महामंडळांनी दखल न घेता बऱ्याच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ज्या गावी बस धावत नाही त्या गावात काही रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत यात बोदलबोडी धानोली दरबडा गिरो ला सोनारटोला तिरखेडी ईसनाटो ला जोशीटोला सिंधीटोला लोहारा गोरे माररकाखांदा कोसमतरा सुरजाटोला गांधीटोला दुर्गटोला सातगाव शितेपाला गोंडीटोला मुरकुडोह भाडीपार गोविंदपुर नदीटोला माताटोला भजेपार दलदलकुही अशा विविध गावात आजही एसटी बस पोहोचलीच नाही त्यामुळे परिवहन महामंडळा विषयी प्रवाशांनी रोस व्यक्त केला आहे काही ठिकाणी रस्ते सुद्धा खराब असल्यामुळे,बस धावत नाही तर काही काही फुलांची उंची कमी असल्यामुळे एसटी बस चालत नाही.

संबंधित,अशा,समस्या बांधकाम विभागांनी सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे सुद्धा पसरले आहेत ते साफसफाई करून द्यावी व व काही गावातून येत असताना इलेक्ट्रिकची तार सुद्धा खालवर आहेत ते सुद्धा एसटी बस येजा करीत असताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते तसेच काही गावातून बस धावताना बऱ्याच लोकांनी रस्त्यावर तनसीचे ढिगारे व काड्या सुद्धा ठेवलेले आहेत तर काही गावात इलेक्ट्रिकचे पोल सुद्धा त्रास देत आहेत तर काही बांधकाम विभागाचे रस्ते सुद्धा अरुंद आहेत गेल्या आठ ते नऊ वर्षापासून बांधकाम विभागाने सुद्धा साफसफाई केली नाही सालेकशा तालुक्यातील चाळीस गावात बसची पर्याययी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील व परिसरातील प्रवासांनी मागणी केली आहे.