Buldhana : बसफेऱ्यांअभावी शालेय विद्यार्थ्यांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

Buldhana : बसफेऱ्यांअभावी शालेय विद्यार्थ्यांचे हाल

चांडोळ : ग्रामीण भागातील कोरोना काळात बंद पडलेल्या बस फेर्‍या पूर्ववत सुरू करण्याबाबत चिखली विधानसभा आमदार श्वेता ताई महाले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथील विभाग नियंत्रकांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.मागील दोन वर्षे गेलेल्या कोराना काळात संपूर्ण देशा मध्ये ताळेबंदिच्या काळात सर्वत्र परिवहन महामंडळाची लालपरी बंद होत्या.त्यानंतर कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू झाले.

परंतु आता सर्वत्र परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.मात्र नियमात शिथिलता आल्यावरही ग्रामीण भागाच्या अनेक बसेस बंद आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी,बाहेर ये जा करणारे नागरिक व प्रवाशी यांना बस अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बंद पडलेल्या एसटी बसची समस्या आमदार श्वेता महाले यांच्या जवळ नागरिकांनी मांडल्या असता त्यांनी नागरिकांची व प्रवाशी आणि विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड बघता महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बुलढाणा आगार व्यवस्थापकास पत्र दिले की, सकाळी ६ वाजता मार्गस्थ होणारी बुलढाणा - चांडोळ - ईरला, सकाळी ७ वाजता धाड - चांडोळ - भारज किंवा धाड - चांडोळ - जाफ्राबाद, दुपारी १२ : ३० वाजता चांडोळ - धाड - मढ - बुलढाणा या बसेस सुरू कराव्या तसेच चांडोळ येथे २ मुकामी बसेस होत्या त्या सुद्धा सुरू करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.

शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी सकाळच्या सत्रातील बसेस सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वेळेवर होईल तसेच प्रवाशांना तासंतास ताटकळत बसावे लागणार नाही.

- विष्णू वाघ, उपाअध्यक्ष भाजपा बुलढाणा तालुका.