एसटीबसचे तिकीट काढा घरबसल्या

चेतन देशमुख - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

यवतमाळ - खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे तिकीट आता प्रवाशांना मोबाईल ॲपवरच बुकिंग करता येणार आहे. 

यवतमाळ - खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे तिकीट आता प्रवाशांना मोबाईल ॲपवरच बुकिंग करता येणार आहे. 

प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्‍लिकवर प्रवाशांना आता आरक्षण करता येणार आहे. गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रवाशांना घरबसल्या आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. गेल्या जूनपासून सर्वांसाठी हे नवीन ॲप्लिकेशन सुरू झाले आहे. मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रवाशाने नोंदणी करून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर आरक्षणाचा तपशील भरावयाचा आहे. त्यात प्रवाशाला कोठे जायचे, कोणत्या बसने जायचे, कोणत्या ठिकाणाहून बसायचे, कोठे उतरायचे आदी पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय सोयीचा आसन क्रमांक, बसचा प्रकार, वेळ आदी प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन पेमेंटची सुविधा हे ॲम्पचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नेट बॅंकिग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. एसटी महामंडळाने msrtc mobie reservation app तयार केले आहे.

Web Title: ST Bus ticket Book easyli