अन् एसटी बस पोहचली आरोग्य केंद्रात

Akola
Akola

किनगावराजा (जिल्हा बुलडाणा) : जागतिक पर्यटनस्थळ असलेले लोणार येथे येण्यासाठी निघालेली बस लोणारकडे न जाता आरोग्य केंद्राकडे वळते... असा काही प्रसंग घडतो का एसटी बस सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा नजीक येताच, चक्क दोन जीव वाचविण्यासाठी आरोग्य केंद्रात दाखल होते.

सिंदखेडराजा येथून सोमवारी (ता.१२) मेहकर आगाराची पुणे ते लोणार एसटी बस (क्रमांक एम.एच.४० वाय ५९२१) लोणार जात होती. सदर गाडी जालना येथे आल्यानंतर गरोदर असलेली मुन्ना बाई नामक महिला व त्यांच्या सोबत एक महिला अशा दोघी जालना येथून लोणार जाण्यासाठी गाडीत चढल्या. एसटी बस जालना येथून मार्गस्थ होत लोणारकडेही  निघाली. त्यानंतर सदर गाडी सिंदखेडराजा बसस्थानकाच्या समोर निघाल्यानंतर सावखेड तेजन फाट्याजवळ गाडीतील गरोदर मुन्नाबाईच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली.

याबाबतची माहिती सोबत असलेल्या महिलेने बस वाहक एस. डी.जोशी यांना सांगितली. त्यांनी याबाबत तत्काळ चालक जि.बी. देव्हरे  यांना कल्पना दिली. त्यांनी जवळ असलेले किनगांव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टराशी संपर्क केला. बस मध्ये असलेले महिला प्रवाशांना गरोदर मुन्नाबाईला मदत केली. परंतु, बस किनगांव राजा जवळ येताच मुन्नाबाईची प्रसुती बस मध्येच झाली. बस चालक जि.बी. देव्हरे व वाहक एस. डी.जोशी यांच्या प्रसंगावधाने किंनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात बस तात्काळ नेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टराची टीम सज्ज होती. त्यांनी लगेच महिला व बाळाची बस मध्येच तपासणी केली. त्यानंतर किनगांव राजा व बस मधील नागरिकांच्या सहाय्याने ट्रेचरच्या सहाय्याने गरोदर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. डॉक्टरानी महिला व बाळाला भर्ती करण्यात करण्यात आले असून बाळाची व महिलेची प्रकृति उत्तम असल्याचे डॉ.अनिल बोडखे व डॉ.संध्या बुधवत यांनी सांगितले.

त्या चालक व वाहकाचे कौतुक
एसटी बसने प्रवास करत असताना अनेकदा कटू अनुभव येत असतो. परंतु, आजच्या चालक व वाहकाच्या समय सुचकतेमुळे एका महिला व तिच्या बाळाची वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे सदर चालक व वाहकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, महामंडळाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com