बदलीनंतरही कर्मचारी जागेवरच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओ संजय यादव यांनी काढले. मात्र, त्यानंतरही विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या प्रेमापोटी सीईओंच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत असल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात आहे.

गत मे महिन्यात जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी जि. प.च्या विविध विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, ही बदली प्रक्रिया पार पडून आज जवळपास दोन महिन्यांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापपर्यंत अनेक विभागांतील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी कामे प्रलंबित राहत असून, याचा त्रास सामान्य ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. सीईओ यादव यांनी ग्रामीण जनतेला होणारा त्रास लक्षात घेता ऑगस्ट महिन्यात एक परिपत्रक जारी केले. यात सर्व विभागप्रमुखांसह पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना देत त्यांच्या अखत्यारित बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करा, असे निर्देश दिले आहेत. तसेच जे कर्मचारी बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरून त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयके अदा करू नये, असेही स्पष्ट बजाविले आहे. जे कर्मचारी बदलीनंतरही बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसतील त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे सुचविले आहे. परंतु, यानंतरही निडर विभागप्रमुखांनी सीईओंच्या या आदेशाला न जुमानता अद्यापही कुठल्याच बदली झालेल्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केले नसल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The staff is still on the move