Maratha Udyog Expo: मराठा उद्योजक एक्सपोमुळे नवउद्योजकांसाठी नवी दारे; संजय वायाळ यांचे युवकांना व्यवसायात पुढे येण्याचे आवाहन

‘मराठा उद्योजक एक्सपो’मधून नवउद्योजकांना व्यवसाय संधी, तज्ज्ञ मार्गदर्शन व नेटवर्किंगची सुवर्णसंधी; उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योगांसह विविध क्षेत्रांचा समावेश
From Agriculture to AI: Sanjay Wayal Announces Diverse Opportunities at Pune Expo

From Agriculture to AI: Sanjay Wayal Announces Diverse Opportunities at Pune Expo

Sakal

Updated on

सिंदखेड राजा : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकतेची नवी दारे खुली करण्याच्या उद्देशाने ‘मराठा उद्योजक एक्सपो’चे आयोजन करण्यात आले असून युवकांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन ईश्वेद बायोटेकचे सीईओ तथा एमयुकेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ यांनी शहरांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.राजमाता राष्ट्रमाता माँ.जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर जाऊन त्यांनी नतमस्तक अभिवादन केले. पत्रकार परिषदेमध्ये संजय वायाळ पुढे म्हणाले की, या एक्सपोमधून युवकांना व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळणार असून,अनुभवी उद्योजकांसोबत संवाद साधण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.मराठा सेवा संघाकडून एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com