
वर्धा : येत्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होवू घातल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यावर नेहमीच शिक्षण विभागाचा भर राहिला आहे. त्यात आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी लक्ष घालत पुढाकार घेतला आहे. येत्या काळात होवू घातलेल्या या परीक्षेचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे.