सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने केला मुलाचा खून

सूरज पाटील
Thursday, 13 August 2020

कमल दमडू चव्हाण (वय ३५, रा. मोझर), असे मृताचे नाव आहे. कमल चव्हाण याचा खून करून मृतदेह गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीत नेऊन टाकला होता. फिर्याद द्यायलाही लवकर कुणी समोर आले नव्हते. तसेच कुठलाही पुरावा उपलब्ध नव्हता. त्याच्या अंगावर केवळ दारू बाटलीच्या काचेने केलेल्या जखमा आढळून आल्या.

नेर (जि. यवतमाळ) : दारूच्या नशेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी शोभा चव्हाण हिच्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. नेर तालुक्‍यातील मोझर येथील तरुणाचा मागील आठवड्यात खून झाला होता. या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते.

कमल दमडू चव्हाण (वय ३५, रा. मोझर), असे मृताचे नाव आहे. कमल चव्हाण याचा खून करून मृतदेह गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीत नेऊन टाकला होता. फिर्याद द्यायलाही लवकर कुणी समोर आले नव्हते. तसेच कुठलाही पुरावा उपलब्ध नव्हता. त्याच्या अंगावर केवळ दारू बाटलीच्या काचेने केलेल्या जखमा आढळून आल्या.

अखेर गोपनीय माहितीच्या आधारे घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना आठवडाभरात यश आले. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने सावत्र आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगडे (वय ४२), शोभा दमडू चव्हाण (वय ५०) या दोघांना अटक केली. पोलिसांना या दोघांच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्याआधारे तपासाची चक्रे फिरवून कमलची सावत्र आई व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेऊन हिसका दाखवला.

सविस्तर वाचा - नातेवाईकांनी साथ सोडल्याने ते एकटे जात होते रुग्णालयात; माणुसकी म्हणून दोघांनी केली मदत, मात्र...

गावातील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. त्यात कमल अडसर ठरत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली अखेरीस सावत्र आईने दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून नरेंद्र ढेंगडे व शोभा चव्हाण यांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार प्रशांत मसराम, स्वप्नील निराळे, नीलेश सिरसाठ, सचिन तंबाखे, कासम जवळीक, पवन चिरडे, भारत पाटील, रोशन गुजर आदींनी केली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The stepmother killed the son