Akot Crime : सावत्र पित्याने केली नऊ वर्षीय मुलाची हत्या; तक्रार करताच समोर आला आरोपी!नेमकं काय घडलं?
Crime News : अकोट शहरात चिमुकल्याची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला गेला होता. हत्येच्या तपासादरम्यान, आरोपी सावत्र पित्याने पोलिसांना चुकवून तक्रार दिली होती.
अकोट : शहर पोलिस स्टेशनला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आलेला इसमच चिमूकल्याचा मारेकरी ठरला. साथीदाराच्या मदतीने त्याने नऊ वर्षीय चिमूकल्याचा मुतदेह एका गोणीत घालून जंगलात फेकून दिला होता.