Hingna Damage sakal
विदर्भ
Hingna Damage : घरावरील छप्पर उडाले, वीज खांब कोसळले; आमदार समीर मेघेंनी केली पाहणी; नुकसान भरपाईची मागणी
Sameer Meghe : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट परिसरात वादळी वाऱ्यामुळे छप्पर उडाले, वीज खांब पडले व घरांचे मोठे नुकसान झाले. आमदार समीर मेघे यांनी पाहणी करत नुकसान भरपाईची मागणी केली असून, प्रशासनाला तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
टाकळघाटः हिंगणा तालुक्यातील टाकळघाट परिसरातील कटरे कॉलनी, गॅस गोडाऊन महालक्ष्मीनगर, खापरी (मोरेश्वर) व पोही (सालईदाभा) या भागात मंगळवारी झालेल्या वादळीवाऱ्यामुळे घराचे छत उडल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले, तसेच घरांच्या भिंतीची पडझड झाली.