esakal | दोन आठवडे पुन्हा कठोर संचारबंदी,  दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पर्यंत अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

, Strict curfew again for two weeks in akola buldana, enforced from three in the afternoon to nine in the morning the next day

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी येते दोन आठवडे अर्थात 7 ते 21 जुलै पर्यंत सकाळी 9 ते दुपारी तीन वाजेपर्यंतच अत्यावश्‍यक सेवा व दुकाने सुरू राहतील. दुपारी तीन नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यंत कठोर संचारबंदी राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. काही अत्यावश्‍यक सेवांना वगळण्याबाबत प्रशासन विचार करेल असेही त्यांनी सांगितले.

दोन आठवडे पुन्हा कठोर संचारबंदी,  दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पर्यंत अंमलबजावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा  : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी येते दोन आठवडे अर्थात 7 ते 21 जुलै पर्यंत सकाळी 9 ते दुपारी तीन वाजेपर्यंतच अत्यावश्‍यक सेवा व दुकाने सुरू राहतील. दुपारी तीन नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यंत कठोर संचारबंदी राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. काही अत्यावश्‍यक सेवांना वगळण्याबाबत प्रशासन विचार करेल असेही त्यांनी सांगितले.


एकेकाळी कोरोना मुक्त झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा या जीवघेण्या आजाराचा संसर्ग वाढू लागला आहे. घाटाखालील व विशेषतः ग्रामीण भागात ही संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला. सदर निर्णयाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, मलकापुर चे आमदार राजेश एकडे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीबद्दल माहिती करून दिली. आपण योग्य त्या उपाययोजना करून या आजाराला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व महसूल यंत्रणा अत्यंत संवेदनशीलपणे व नियोजनबद्ध काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बुलडाण्यात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. हे लक्षात घेऊन आपण तसा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.

आरोग्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात मंजुरात देण्याबाबतही सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच आपली लॅब सुरू होईल. यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च शासन करणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
अत्यावश्‍यक कामे वगळता इतर फिरणा-यांची व मास्क किंवा इतर खबरदारीचे उपाय योजना न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सामान्य नागरिक याचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे हा संसर्ग वाढू शकतो तो आटोक्‍यात ठेवण्याच्या दृष्टीने पुढील दोन आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवली जातील. यामधून वृत्तपत्र दूध व इतर अत्यावश्‍यक बाबी संदर्भात पोलिस प्रशासन निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात रेती चोरट्यांची संख्या वाढलेली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून यावर निश्‍चितच कार्यवाही केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


कोरोना रुग्णांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण म्हणजे कैदी नव्हेत. तीदेखील माणसेच आहेत त्यामुळे त्यांची योग्य ती खबरदारी घेण्याची व सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याची जाणीव ठेवून प्रशासनाने काम केले पाहिजे. दुकानांच्या बाबतीत व संचार बंदी च्या बाबतीतही मलकापूर नांदुरा आणि इतर ठिकाणी देखील याचे पालन केले जाणार आहे.

प्रत्येक आमदाराकडून दहा लाख
टेस्टिंग किटस्‌ साठी जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. माझे प्रत्येकाशी तसे बोलणे ही झाले आहे. त्यामुळे सर्वजण या संकटाच्या काळात आपला निधी किटसाठी देतील असा विश्वास असल्याचे डॉ .शिंगणे यांनी सांगितले.

loading image