कर्तव्यकठोर अधिकाऱ्याने आणली रुग्णालयाची गाडी रुळावर आणि पुसला "रेफर टू'चा डाग 

yavatmal medical collage
yavatmal medical collage
Updated on

यवतमाळ : येथील वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे "रेफर टू नागपूर' असे ओळखले जात होते. मात्र, कोरोनाच्या संकट काळात एकाही रुग्णाला नागपूरला रेफर करण्यात आले नाही. उलट मुंबई व अकोला येथून आलेल्या दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांनाच अपवादात्मक परिस्थितीत नागपूरला हलविण्यात आले आहे. कोरोना संकट काळात या वैद्यकीय महाविद्यालयाचा "रेफर टू'चा डाग पुसला गेला, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय वर्तुळात उमटत आहे. 

मार्च महिन्यापासून वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांची चमू कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात महागडा उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातच धाव घ्यावी लागते. तीन-चार वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी कर्तव्यकठोर आणि शिस्तीने रुग्णालयाची गाडी रुळावर आणली. डॉक्‍टरांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. कोरोनाच्या संकट काळात दररोज पॉझिटिव्ह येणारे रिपोर्ट व त्यातही गंभीर रुग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरांची तारांबळ उडते. या काळात येथील आयसोलेशन वॉर्डातून एकाही रुग्णाला इतरत्र हलविण्यात आले नाही. ही जमेची बाजू मानली जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 56 आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह 225 झाले असून, यापैकी तर 161 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 3,527 नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. आतापर्यंत 3,172 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. याच काळात अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी अपघात विभागात भरती करण्यात आले. बहुतांश रुग्णांवर येथेच उपचार करण्यात आले. केवळ गंभीर जखमींनाच नागपूरला हलविण्यात आले. 

अपघात विभागात दाखल रुग्णांवर वेळेत उपचार करता यावे, यासाठी आमचा प्रयत्न राहतो. मागील काही महिन्यांत रेफर रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. केवळ गंभीर रुग्णांनाच रेफर करण्यात आले. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची परवड होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात डॉक्‍टरांची चमू 24 तास कार्यरत आहेत. 
-डॉ. अरविंद कुडमेथे 
अपघात विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com