
साकोली : साकोली बस स्थानकाच्या समोर इलेक्ट्रिक गाडीवर तीन मित्र जात असताना ट्रॅक्टरच्या मागील भाग डोक्याला घासून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडलेली आहे .भावेश नारायण ब्राह्मणकर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो चिचटोला पळसगाव येथील रहिवासी आहे.