esakal | मुख्याध्यापक विद्यार्थिनीला बोलवायचा एकांतात.... अखेर मिळाला न्याय
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. दहा फेब्रुवारी 2017 ला पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी आली असता, गुप्तांग दुखत असल्याचे आईला सांगितले. मात्र, आईने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी नेहमीच तक्रार करायला लागल्याने आईने प्रेमाने विचारणा केली. त्यावेळी मुख्याध्यापकाचा काळा चेहरा उघड झाला. शिवाय शाळेतील पाच विद्यार्थिनींसोबत असेच कृत्य केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

मुख्याध्यापक विद्यार्थिनीला बोलवायचा एकांतात.... अखेर मिळाला न्याय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : शाळकरी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहीउद्दीन यांनी मंगळवारी (ता.18) दिला. रमेश भाऊराव तुमाने (वय 47, रा. चांदोरेनगर, यवतमाळ), असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. दहा फेब्रुवारी 2017 ला पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी आली असता, गुप्तांग दुखत असल्याचे आईला सांगितले. मात्र, आईने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी नेहमीच तक्रार करायला लागल्याने आईने प्रेमाने विचारणा केली. त्यावेळी मुख्याध्यापकाचा काळा चेहरा उघड झाला. शिवाय शाळेतील पाच विद्यार्थिनींसोबत असेच कृत्य केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. दुसर्‍या दिवशी अकरा फेब्रुवारी 2017 ला पीडित विद्यार्थिनी व तिच्या आईने बाभूळगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपी तुमाने याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. 


पीडितेसह इतर विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडिता, तिची आई व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच आरोपीने स्वत: साक्ष दिली होती.

- मिरचीलाही? करोनाची भिती, वाचा नेमके काय...
 

जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहीउद्दीन यांनी कलम 376(2), (आय)(एन)(एफ), 354-ए(1), 506, भांदवी व कलम 6 बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, 2012 प्रमाणे जन्मठेप, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, असा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे, सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली.

नांदुरा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशील होता. तपास पथकातील सर्व कर्मचार्‍यांनी खूप मेहनत घेतली. सरकारी पक्षाने भक्कम बाजू मांडली. पैरवी अधिकारी प्रकाश रत्ने यांनी खूप पाठपुरावा केला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तपासाची संधी दिली. 
- पीयूष जगताप
तत्कालीन एसडीपीओ, यवतमाळ.

'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले
 

कार्यालयात बोलवायचा...
मुख्याध्यापक तुमाने शाळकरी विद्यार्थिनींला कोणतेही सांगून कार्यालयात बोलवायचा. नकोसे वाटणारे अश्‍लिल लैंगिक कृत्य करायचा. याबाबत कुणाला सांगितल्यास पुन्हा असेच करेल, अशी धमकी द्यायचा. तुमाने या मुख्याध्यापकाने शाळेतील इतरही पाच विद्यार्थिनींसोबत असे प्रकार वारंवार केले होते. ही आपबिती पीडितेने तिच्या आईला सांगितल्याने बिंग फुटले. 

आई आणि तिने मिळून निवडले तांदूळ अन्‌ वरच्या माळ्यावर निघून गेली
 

एकाच प्रकरणात पाच शिक्षा
नांदुरा येथील लैंगिक शोषण प्रकरणात पीडित विद्यार्थिनी पाच होत्या. पाच स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले होते. 376 चे तीन व 354चे दोन गुन्हे होते. 376च्या गुन्ह्यात जन्मठेप व 354च्या प्रत्येक गुन्ह्यात पाच वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली. एकाच लैंगिक अत्याचार प्रकरणात पाच शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.