esakal | आश्रमशाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांना का म्हणाले... 'आम्हाला कारागृहात पाठवा'?
sakal

बोलून बातमी शोधा

jail

आश्रमशाळेतील विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांना का म्हणाले... 'आम्हाला कारागृहात पाठवा'?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमरावती : भिक्षेकरी मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने हजारो नागरिकांच्या सहकार्यातून मतीन भोसले यांनी उभारलेल्या प्रश्‍नचिन्ह ही फासेपारधी बालकांची शाळा समृद्धी महामार्गाच्या कामांमुळे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या प्रश्‍नचिन्ह शाळेच्या इमारतीला सुरू असलेल्या समृद्धी मार्गाच्या कामांमुळे हादरे बसत आहेत. त्यामुळे भिंतींना तडे गेले आहेत. धुळीमुळे बालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शासनाने त्वरित या गंभीर मुद्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी मतीन भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
2019-20 या शैक्षणिक वर्षांत फासेपारधी समाजाची 571 बालके शिक्षण घेत आहेत. समृद्धी महामार्गामध्ये या प्रकल्पाची 10 एकर शेतजमीन गेली आहे.

या आश्रमशाळेची जोपर्यंत पुन्हा नव्याने उभारणी करून दिली जात नाही, तोपर्यंत आमच्या सर्वांची व्यवस्था जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात यावी, अशी मागणी या आश्रमशाळेतील विद्यार्थी तसेच फासेपारधी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

मेळाव्यांच्या नावावर शिक्षक घेतात पर्यटनाचा आनंद... विद्यार्थ्यांच्या नुकसानाची कुणाला पर्वा?

लोकवर्गणीतून दोन विहिरींचे खोदकाम करण्यात आले. या विहिरीतून विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटविण्यात आला होता, मात्र या विहिरी आता बुजविण्यात येणार असल्याने बालकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न निर्माण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना श्‍वसनाचे विकार होत असल्याचा आरोप भोसले यांनी केला.

समृद्धी महामार्गामध्ये उद्‌ध्वस्त झालेला शाळेचा प्रकल्प नव्याने बांधून देण्यात यावा, दोन्ही विहिरी बुजविण्यापूर्वी दोन नवीन विहिरींचे खोदकाम करून देण्यात यावे, शाळेच्या कोसळलेल्या पिल्लरखाली दबून मृत्यू पावलेल्या भारती बेलसरे हिच्या पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, धुळीमुळे धोक्‍यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी आश्रमशाळेच्या सभोवताल 10 फूट उंच संरक्षणभिंत उभारण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.