विद्यार्थ्यांसाठी ‘गिफ्ट मिल्क’ उपक्रम

नीलेश डोये 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - विद्यार्थी पटसंख्या कायम राहावी तसेच त्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे याकरिता त्यांना सुगंधित, चविष्ट आणि जीवनसत्त्व युक्त दुधाचे गिफ्ट दिले जाणार आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डकडून (एनडीडीबी) ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात देशभरातील २२ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात याचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रातून केवळ नागपूरचा जिल्ह्याचा समावेश आहे. 

‘आरटीई’सारखा कायदा करण्यात आला तरी ग्रामीण भागात शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत आहे. शासनाकडून यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत दूध पुरविण्याची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. हे दूध चविष्ट नसल्याने विद्यार्थी पीत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.  विद्यार्थ्यांनी हे दूध प्यावे, यासाठी त्याला अधिक चविष्ट व सुगंधित करण्यात आले आहे. तसेच दुधात पौष्टिक जीवनसत्त्वाचा भर टाकण्यात आला आहे. हे चविष्ट, सुंगधित आणि पौष्टिक दूध विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम एनडीडीबी राबविणार आहे. 

नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमधील ६ हजार विद्यार्थ्यांना हे दूध मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३, आदिवासी विभागाच्या ६ तर समाजकल्याण आणि महानगरपालिकेच्या एक-एक शाळांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘गिफ्ट मिल्क’ ही योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी दूध प्यावे म्हणून ते अधिक चविष्ट, सुगंधित असणार आहे. त्याचप्रमाणे त्यात पौष्टिक जीवनसत्त्वही असणार आहेत. या योजनेसाठी राज्यात फक्त नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे. 
-रवींद्र ठाकरे, प्रकल्प संचालक, दुग्ध व्यवसाय विकास प्रकल्प.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students Gift Milk activities