esakal | Video : शाळा पाडायला आला जेसीबी, विद्यार्थी झाले संतप्त... मग उचलले हे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

prashnchinha school

समृद्धी महामार्गात "प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची जागा गेली. त्यावेळी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. परंतु, अद्याप पूर्तता झाली नाही. महामार्गाला लागूनच शाळेची इमारत असल्यामुळे धुळीचे लोळ इमारतींवर ढग बनवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार जडले आहेत. सहावीतील विवेक गजानन भोसले, तिसरीतील शेखर इर्जित पवार, दुसरीतील पीयूष सुभाष पवार यांना धुळीमुळे खाज सुटली आहे.

Video : शाळा पाडायला आला जेसीबी, विद्यार्थी झाले संतप्त... मग उचलले हे पाऊल

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

मंगरुळ चव्हाळा (जि. अमरावती) : मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील चिमुकले विद्यार्थी नुकतेच रांगेने जेवायला बसले. घास दोन घास पोटात न जाते तोच, धुळीचे लोळ उठले. यंत्रांचा कर्णकर्कश आवाज घुमू लागला. विद्यार्थी भेदरले. ताटावरून उठले. एकच हल्लकल्लोळ झाला. "जेसीबी आले. जेसीबी आले'. चिमुकले विद्यार्थी धावले. यंत्रापुढे उभे ठाकले. "आमची शाळा पाडू देणार नाही', असे ठणकावून सांगू लागले. 

गुरुवारपासून मतीन भोसले त्यांच्या सहकाऱ्यांसह समृद्धी महामार्गावरच "बेमुदत धरणे' आंदोलनासाठी पेंडॉल टाकून बसले. महामार्गाचे काम सुरूच होते. सहाएक भलीमोठी यंत्रे उभी होती. शुक्रवारी मात्र आणखी 25 एक मोठी यंत्रे दाखल झाली. मतीन भोसले यांनी उभारलेल्या टिनाच्या खोल्या पाडायला पुढे निघाली. यंत्रांचा कानठळ्या बसविणारा आवाज ऐकूणच विद्यार्थी जेवणाच्या पंगतीवरून उठले. ते पुढे गेले आणि थेट यंत्रांना आडवे गेले. 

समृद्धी महामार्गात "प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेची जागा गेली. त्यावेळी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. परंतु, अद्याप पूर्तता झाली नाही. महामार्गाला लागूनच शाळेची इमारत असल्यामुळे धुळीचे लोळ इमारतींवर ढग बनवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार जडले आहेत. सहावीतील विवेक गजानन भोसले, तिसरीतील शेखर इर्जित पवार, दुसरीतील पीयूष सुभाष पवार यांना धुळीमुळे खाज सुटली आहे.

येस बॅंकेत नागपूर विद्यापीठाचे अडकले तब्बल १९१ कोटी...सिनेट सदस्य संतापले

तिघेही खाजेमुळे त्रस्त झाले आहेत. पहिलीतील रोहित गजानन शिंदे, तिसरीतील सनी सरल राठोड, पाचवीतील ज्योती मुंगाजी बावस्कर यांना तर सतत खोकल्याची उबळ येत आहे. नववीतील शेखर लच्छीराम सोळंके हा विद्यार्थी तापाने फणफणत आहे. अशी जवळपास ऐंशीएक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. 

फासेपारधी समाज भ्याड नाही. मागे हटणारा नाही. परंतु, सरकार छोट्या विद्यार्थ्यांचाही विचार करत नसेल तर आम्ही शिकावे कसे? शिक्षणाचा हा प्रकल्प उद्‌वस्थ होऊ देऊ नये, अशी सरकारला कळकळीची विनंती आहे. 
- मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा 

loading image
go to top