दुचाकीवर आलेल्या चौघांनी मुलांना नेले पडक्या विहिरीकडे तर मुलींना दूर नेत केले अश्‍लील चाळे

सूरज पाटील
Wednesday, 24 February 2021

यवतमाळ : शिकवणी वर्गातील दोन विद्यार्थ्यांसह दोन मुली रस्त्यावर उभे राहून बोलत असल्याची संधी साधून अनोळखी चौघांनी मोबाइल हिसकले. विद्यार्थ्यांना मारहाण करीत मुलींची छेड काढली. सुदैवाने ओळखीचे तरुण तिथे पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना वडगाव ते एमआयडीसी लोहारा डांबरी रोडवर स्ट्रीट लाइटजवळ घडली.

चौघेही शिकवणी वर्गातील मित्र आहेत. त्यांचे दुपारी साडेबारा ते सायंकाळी सातपर्यंत वर्ग राहतात. सोमवारी दोन वाहनांनी चौघेही बायपासने गेले. डांबरी रस्त्यावरील स्ट्रीट लाइटजवळ उभे राहून गप्पा करीत असताना एका दुचाकीने चार युवक काठी घेऊन आले. विद्यार्थ्यांकडील ३५ हजार रुपये किमतींचे चार मोबाइल हिसकले. दुचाकीची चाबी काढून घेतली. त्यांना मारहाण करीत पडक्या विहिरीकडे घेऊन गेले.

दोन्ही विद्यार्थिनींना दूर नेत त्यांच्याशी अश्‍लील चाळे केले. दहा हजार रुपये दिल्यास सोडून देऊ अन्यथा ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. तितक्याच ओळखीचे तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या लक्षात ही घटना आली. मित्रांनी त्या अनोळखी युवकांचा पाठलाग करताच झाडाझुडुपात पळून गेले.

अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी

तावडीतून सुटका होताच चौघांनी दारव्हा मार्गावरील पेट्रोल पंप गाठून एका विद्यार्थ्याने भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून अनोळखी चौघांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. यापूर्वीदेखील बायपासवर तरुण-तरुणींना अडवून लुटमार व छेडखानीच्या घटना घडल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students were beaten and girls were molested In Yavatmal