esakal | धारणीतील हल्लेखोर वाघिणीला पकडण्यात यश
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

धारणीतील हल्लेखोर वाघिणीला पकडण्यात यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : तालुक्‍यातील सुमारे 20 गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या तसेच अनेकांवर हल्ले करणाऱ्या इ-वन वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. रविवारी (ता. 1) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गोलाई शिवारातून या वाघिणीला गुंगीचे इन्जेक्‍शन देऊन जेरबंद करण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता. 30) रात्री या वाघिणीने दादरा गावातील शोभराम चव्हाण नावाच्या व्यक्तीला ठार केले होते तर दिलीप चव्हाण याला गंभीर जखमी केले होते. यापूर्वी या वाघिणीने अनेक गावांमधील पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता तसेच अनेकांना जखमी केले होते. त्यामुळे या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर वाघिणीला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. वाघिणीला पकडण्यासाठी विशेष तीन पथक शनिवार (ता. 31) रात्री मेळघाटमध्ये दाखल झाली होते. या पथकाला हल्लेखोर वाघीण गोलाईच्या जंगलात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोलाई जंगलात सर्च ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली. रविवारी (ता.1) रात्री 12.30 वाजताच्या सुमारास ट्रॅंक्‍यूलायजरच्या साहाय्याने तिला जेरबंद करण्यात यश आले, अशी माहिती मिळाली आहे.

loading image
go to top