(Video)...अन् सुरू झाला शहराकडून गावाकडचा प्रवास, वाचा वेगळ्या ध्येयाने पछाडलेल्या तरुणाची यशोगाथा

success story about young man aatish wasnik, he works in Melghat
success story about young man aatish wasnik, he works in Melghat

नागपूर : ‘‘चार वर्षांची डिग्री हे कधीच ठरवू शकत नाही की, पुढील आयुष्यात आपण काय करावे. आता फक्त संगणकासमोर आपले जीवन व्यतीत न करता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काय करता येईल, हे ठरवले. पाणी फाउंडेशनसोबत काम करताना पहिल्यांदा गाव जवळून बघायची संधी मिळाली. तसेच शेती विषयाशी आत्मीयता असल्याने या प्रश्नावर काम करायचे ठरवले. तेव्हा खऱ्या अर्थाने शहराकडून गावाकडचा प्रवास सुरू झाला.’’ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊनही शेतीक्षेत्रात काम करण्याची ओढ असल्याने समाज प्रगती संयोग संस्थेसोबत मेळघाटसारख्या दुर्गम भागात रसायनरहित शेतीवर काम सुरू करणाऱ्या आतिश वासनिकचे हे बोल काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत.

आपल्या या वेगळ्या वाटेबद्दल आतिश सांगतो, बऱ्याच लोकांचा प्रवास खेड्याकडून शहराकडे होतो, पण माझ्याबाबतीत उलट झाले. मी मूळचा वर्धेचा. माझे प्राथमिक शिक्षण वडनेर या गावी झाले, शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण वर्धेला झाले. अभियांत्रिकी शिक्षण रामटेक व पदव्युत्तर पदविका एनपीटीआय, नागपूर येथून झाले.

पुढे नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर असा प्रवास करून आल्यावर कळले की आपली खरी गरज जिथे आहे तिथे आपल्या शिक्षणाचा वापर करावा. त्यातच निर्माणचा कॅम्प झाला. ज्यात ‘स्व’चा शोध झाला. आपल्या जगण्याला काही हेतू असावा, आपली सामाजिक जबाबदारी काय? अशा बऱ्याच प्रश्नांचा उलगडा होत गेला आणि आपण एकटे नाही. आपल्यासारखे विचार करणारे बरेच मित्र मिळाले.

शेतीला दिली इंजिनिअरिंगची जोड


इंजिनिअरिंगचा आपल्याला काहीतरी लाभ व्हावा हा विचार मनात असताना अशोक बंग संचालित चेतना विकास संस्था (आलोडी, वर्धा) येथे शेतीक्षेत्र आणि इंजिनिअरिंग याला मिळून काम करण्याची संधी मिळाली. स्वावलंबी शेती (मिश्र शेती) अंतर्गत जंगली जनावरांपासून शेताचे रक्षण कसे करता येईल, यावर रिसर्चर म्हणून काम करत आले. काही मॉडेल तयार केले. सोलर कुंपण खरेदी करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. दहा एकराला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. त्यावर उपाय म्हणून कुत्रा भुंकण्याचा किंवा माणूस ओरडण्याचा आवाज येतो, असे उपाय केले. यावर आणखी रिसर्च सुरू आहे. त्यावेळी इंजिनिअरिंगचा काही उपयोग झाल्याचे समाधान वाटल्याचे आतिश सांगतो.

निर्माण’मुळे अतर्बाह्य बदल...

निर्माणच्या कॅम्पमध्ये ‘स्व’चा शोध झाला. आपल्या जगण्याला काही हेतू असावा, आपली सामाजिक जबाबदारी काय? अशा बऱ्याच प्रश्नांचा उलगडा होत गेला आणि आपण एकटे नाही आपल्यासारखे विचार करणारे बरेच मित्र मिळाले. तेव्हाच लक्षात आले चार वर्षांची डिग्री हे कधीच ठरवू शकत नाही की येणाऱ्या आयुष्यात (पुढील ४०-५० वर्षे ) आपण काय करावे, हे कळून चुकले. आता फक्त संगणकासमोर आपले जीवन व्यतीत न करता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काय करता येईल, हे ठरवले. पाणी फाउंडेशनसोबत काम करताना पहिल्यांदा गाव जवळून बघायची संधी मिळाली. तसेच शेती विषयाशी आत्मीयता असल्याने या प्रश्नावर काम करायचे ठरवले. तेव्हा खऱ्या अर्थाने शहराकडून गावाकडचा प्रवास सुरू झाल्याचे आतिश गर्वाने सांगतो.

 
रसायनरहित शेतीबद्दल जनजागृती
मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागात शेती प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेसोबत काम करताना आपली नेमकी गरज लक्षात आली. या संस्थेत रसायनरहित शेतीबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्याच्या फायद्याबद्दल लोकांना माहिती देणे, रासायनिक खत/औषधी, त्याचा मेळघाटसारख्या दुर्गम भागात वाढणारा वापर याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली. रसायनरहित मालाला योग्य भाव मिळवून देण्याकरिता काही कंपनीशी शेतकऱ्यांचा थेट संपर्क घडवून आणला. वर्धा येथील चेतना विकास संस्थेसोबत काम करताना डॉ. अशोक बंग, निरंजना बंग यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले.
आतिश वासनिक, सदस्य, निर्माण (सातवी बॅच) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com