Success Story : तीन मित्र बनले एकमेकांचे ‘कोच’; एकमेकांशी चर्चा करत जैद, आदित्य, द्रौपदचे नीटमध्ये यश
NEET Success : यवतमाळच्या तीन मित्रांनी कोचिंग क्लास न वापरता एकमेकांच्या मदतीने ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तिघेही डॉक्टर होणार आहेत. दोस्तीच्या शक्तीने आणि एकमेकांच्या सहाय्याने ते यशाच्या शिखरावर पोहचले.
यवतमाळ : यशस्वी होण्यासाठी महागडे कोचिंगच गरजेचे नसते. खरी गरज असते सचोटीची. त्यातच समविचारी संगत लाभली तर यशाला वेगळेच परिमाण लाभते. हीच गोष्ट यवतमाळच्या तीन मित्रांनी खरी करून दाखवली.