Success Story : सौरभने फडकविली साता समुद्रापार पताका; काटा ते न्यूयॉर्क : शेतकरी कुटुंबातील मुलाची अमेरिकेत मास्टर्स पदवी
Education Journey : वाशीम जिल्ह्यातील काटा गावातील सौरभ श्रीराम मंत्री यांनी अमेरिकेतील रायडर युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ अकाउंटन्सी आणि बिझनेस अनालिटिक्समध्ये डिस्टिंक्शन हॉनर प्राप्त केला. त्यांनी आपल्या संघर्षपूर्ण प्रवासात आर्थिक अडचणी आणि सांस्कृतिक फरक पार करत आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांना यशस्वी केले.
वाशीम : तालुक्यातील काटा गावातील रहिवासी सौरभ श्रीराम मंत्री यांनी अमेरिकेत मास्टर्स पदवी प्राप्त केली. त्याची ही शैक्षणिक वाटचाल म्हणजे सात समुद्रापार करून अमेरिकेत आपल्या गावासह देशाच्या नावाची पताका फडकविली आहे.