
धानोरा : अनेकदा वादळ येते, जोरदार वारा वाहतो, पाऊस कोसळू लागतो, ढगांचा गडगडाट होतो आणि कडकडाट करत एखाद्या वेळेस वीज कोसळते. मात्र येथील विद्यानगर परीसरात कोणतीही पूर्वसूचना न देता अकस्मात वीज कोसळल्याने परीसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. ही वीज येथे प्रशांत कोडाप यांच्या घरावर कोसळली असून घराच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवार (ता. ८) रात्री ८. ३० वाजताच्या सुमारास घडली.