काय सांगता! या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस…लोकांच्या घरावर, अंगणात मासोळ्याच मासोळ्या

प्रभाकर कोळसे
Sunday, 30 August 2020

वर्धा जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) दिवसभर पावसची रिपरिप सुरू होती. रात्रीही पावसाची रिमझिम सुरूच होती. या पावसाबरोबरच हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर गावात चार ते पाच जणांच्या घरी, अंगणात, घराच्या छपरावर पावसासोबत मासोळ्या पडल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. अचानक घरासमोर पडलेल्या मासोळ्या पाहून नागरिक अचंबित झालेत.

नंदोरी (जि. वर्धा) : वर्धा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसासोबतच हिंगणघाट तालुक्‍यातील बोपापूर येथे मासोळ्या पडल्याने गावात अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. एका नाही तर तब्बल चार ते पाच घरांवर या मासोळ्या पडल्याने गावकरीही चिंतेत पडले आहेत. या संदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा समितीने हा प्रकार खोडसाळ वृत्तीतून घडल्याचे म्हटले आहे.

गुरुवारी (ता. २७) दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. रात्री पावसाची रिमझिम सुरूच होती. या पावसाबरोबरच बोपापूर येथील चार ते पाच जणांच्या घरी अंगणात, घराच्या छपरावर पावसासोबत मासोळ्या पडल्याचे दिसल्या.

बोपापूर गावातील विकास तिघरे, गजानन दौलतकर, भुजंग खंडाळकर, अविनाश वाघ यामुळे चकित झाले. शुक्रवारी सकाळी हे गृहस्थ घराबाहेर आले असता त्यांना अंगणात, छपरावर मासोळ्या दिसून आल्या सुरुवातीला अविनाश वाघ यांना हा खोडसाळपणा वाटला. मात्र, गावात इतर घरीही हा प्रकार घडल्याचे उघडकीस आल्याने त्यांनाही याचे आश्‍चर्य वाटले.

अंनिस याचा तपास करेल
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आकाशातून मासोळ्या पडणे कदापि मान्य नाही. हा नक्कीच मानवीकृतीतून केलेला खोडसाळपणा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा तपास करेल.
- पंकज वंजारे,
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वर्धा.

असं घडलंच कसं  : अरे काय हे दुर्दैव! कुठे भिंत खचली तर कुठे चूल विझली; तब्बल इतक्या गावांत पाणीच पाणी

हा कुणीतरी केलेला खोडसाळपणा
हा खोडसाळपणा राहू शकतो. जसे की एखाद्या घरावर गोटे मारण्याचा प्रकार अनेक खेडे गावात होतात. तो प्रसंग कोणाला माहिती होता बाजूच्या घरावर गोटे मारतो. तो प्रकार भानामती या नावाने लोकांमध्ये पसरवत असतात. ज्यामुळे समाजात अंधश्रद्धा निर्माण होतात. ही अशीच अफवा बोपापूर गावात माशांचा पाऊस पडला. काही खोडसाळ व्यक्तीने मासळी जमा करून फेकल्या असाव्यात.
- सुनील कानकाटे
अंनिस कार्यकर्ता, हिंगणघाट.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suddenly fishes felt from the sky in wardha