
नागपूर : सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने साखरेच्या कोट्यात कपात केली आहे. त्याचे थेट परिणाम बाजारात जाणवू लागले आहेत. ऑगस्टसाठी केंद्र सरकारने २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २.५ लाख टनाने कमी आहे. त्यामुळे साखरेच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे.