व्यसनाधीन तरुणाची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर) : येथील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील साई सोसायटी न्यू येरखेडा येथे व्यसनाधीन युवकाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 31) दुपारच्या सुमारास घडली. विलास अंबादास बरगट असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कामठी (जि.नागपूर) : येथील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील साई सोसायटी न्यू येरखेडा येथे व्यसनाधीन युवकाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 31) दुपारच्या सुमारास घडली. विलास अंबादास बरगट असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार साई सोसायटी न्यू येरखेडा येथील रहिवासी असलेला विलास अंबादास बरगट (41) याला दारूचे व्यसन होते. मागील आठ-दहा वर्षांपूर्वी दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. व्यसनाच्या आहारी गेलेला विलास व्यसन पूर्ण करण्याकरिता घरातील सामान विकत असे. त्याचप्रमाणे शनिवारी दारू पिण्याकरिता घरातील मिक्‍सर मशीन विकण्याकरिता घेऊन जात असताना त्याच्या आई व बहिणीने अडविले. विलासने आई व बहिनीला मारहाण केली. त्यामुळे विलासची आई व बहीण त्याची नवीन कामठी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याकरिता गेले असता कारवाई करण्याची मागणी करून निघून गेल्या. थोड्या वेळाने पुन्हा त्या पोलिस ठाण्यात येऊन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना विलास घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे प्रकरण म्हणून दखल घेतली. पुढील तपास एपीआय प्रशांत साखरे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by the addiction of an addicted teen