esakal | काय म्हणता?आयसोलेशन वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णाने घेतला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

carona

तुमसर तालुक्‍यातील देव्हाडा (बु.) येथील ५० वर्षीय व्यक्तीमध्ये चार दिवसांपूर्वी कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याला उपचारासाठी येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आणल्यापासून तो तणावात असल्याचे अन्य रुग्णांनी सांगितले.

काय म्हणता?आयसोलेशन वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णाने घेतला गळफास

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात सोमवारी (ता. १७) सकाळी एका ५० वर्षीय रुग्णाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. तुमसर तालुक्‍यातील देव्हाडा (बु.) येथील ५० वर्षीय व्यक्तीमध्ये चार दिवसांपूर्वी कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याला उपचारासाठी येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आणल्यापासून तो तणावात असल्याचे अन्य रुग्णांनी सांगितले. सोमवारी सकाळी या वॉर्डातील एक व्यक्ती बाथरूमला गेली असता तिथे एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत भंडारा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला आहे.

सविस्तर वाचा - अरेरे... मुलींच्या लग्नाचे सुख पाहण्याआधीच मृत्यूने कवटाळले, जाणून घ्या सविस्तर घटना

आणखी दोघांचा मृत्यू
रविवारी कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत महिला ही एका शाळेची शिक्षिका असून तिला काही दिवसांपासून दमा व खोकल्याचा त्रास होता. यापूर्वीच या महिलेचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या आईला संसर्ग झाला. या महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. तसेच एका ७३ वर्षीय वृद्धाचाही मृत्यू झाल्यचे कळतेय आतापर्यंत जिल्ह्यात एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढते आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image