सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

वानाडोंगरी (जि. नागपूर) :  देशाचा विकास दर प्रथमच पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन युवानेते सुजात आंबेडकर यांनी केले.

भारिप-बहुजन-महासंघ व वंचित बहुजन आघाडी हिंगणा विधानसभेच्या वतीने हिंगणा-रायपूर येथील बौद्ध हक्क परिषद येथे आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वंचित-बहुजन-आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने होते. देशाला अनर्थ नव्हे तर सक्षम अर्थमंत्र्यांची गरज आहे. दुसऱ्यांदा भाजप सरकार बहुमताने विजयी झाल्यामुळे देशातील जाती-जमाती-मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचितांचे शासनच बहुजनांच्या हिताचे रक्षण करणार आहे, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujat Ambedkar said, Help the underprivileged to save democracy