आली कशी ही वेळ! शेतकरी नेत्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर

आली कशी ही वेळ! शेतकरी नेत्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर

यवतमाळ : जिल्ह्यात यंदा सोयाबीननंतर उन्हाळी भुईमुगाचे पीक (Summer groundnut crop) धोक्‍यात आले आहे. खरिपातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली. भुईमूग पीक पिवळे पडले असून, शेंगा धरल्या नाहीत. अनेक ठिकाणी शेंगांना कोंब फुटले आहे. परिणामी शेकडो हेक्‍टरवरील भुईमूग पीक मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. खरीप, रब्बी व आता उन्हाळी पीक शेतकऱ्यांच्या हातून जात असताना शेतकरी नेते मात्र भूमिगत (Farmer leaders underground) आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत कुणीही बोलायला तयार नसून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. (Summer crop trouble after soybeans Yavatmal news)

कोरोना संकटासोबतच शेतकऱ्यांना नापिकीशीदेखील दोन हात करावे लागत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाने दगा दिला. बोगस बियाण्यांच्या तब्बल १२ हजार तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात आल्यात. मात्र, त्या तक्रारींमधून काहीच साध्य न झाल्याने शेतकरी निराश झालेत. त्यानंतर रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना फटका बसला.

आली कशी ही वेळ! शेतकरी नेत्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर
रविवारपासून कडक लॉकडाउन, वैद्यकीय सेवा वगळून किराणा भाजीपाल्यासह सर्वच बंद

सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास पाच हजार हेक्‍टरवर भुईमुगाचा पेरा केला. अनेक ठिकाणी पीक पिवळे पडले असून, शेंगाही लागल्या नाहीत. बोगस बियाणे की, आणखी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी नुकसानीच्या दारात उभे असताना कृषी विभागासह विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर येऊन साधी पाहणीदेखील केली नाही.

सध्या उन्हाळी भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. आधीच शेंगा कमी लागल्या आहेत. त्यानंतर भुईमुगाच्या शेंगांना जमिनीच्या आतच कोंब फुटल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पीक शेतकऱ्यांच्या हातात न आल्याने उन्हाळी पिकातही नुकसान सहन करावे लागत आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व आता भुईमूग शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. येणाऱ्या खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे. दोन हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नैराश्‍य आले आहे.

कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रांनी बदलत्या वातावरणात टिकणारे बियाणे संशोधित करून शेतकऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व विदर्भाचे कृषी मध्यवर्ती संशोधन केंद्र यवतमाळात असूनही त्याचा काहीच उपयोग नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. शेतकरी नेते म्हणून वावरणारेही या प्रश्‍नावर बोलताना दिसत नाहीत.
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकरी पुन्हा अडचणीत

गेल्यावर्षीपासून शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. कोरोनाच्या काळात केवळ शेती व्यवसाय तग धरून आहे. मात्र, शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच एक एक हंगाम हातून जात असल्याने भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पीक हातात येण्याची शक्‍यता मावळल्याने शेतकऱ्यांनी पिकांत जनावरे सोडली आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावीत, अशी मागणी होत आहे.

(Summer crop trouble after soybeans Yavatmal news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com