
अचलपूर : पोटात नऊ महिन्यांचा गर्भ, मेंदूत पाणी अन् ब्रेनट्यूमर, अशा परिस्थितीत बाळासह आईला वाचविण्यासाठी सुपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावले. मेळघाटच्या आडनदी गावातील प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची मेंदूतील दुर्लभ ट्यूमरसाठी व्हीपी शंट नावाची शस्त्रक्रिया यशस्वी करून जीवनदान दिले आहे.