यवतमाळ रेल्वेस्थानकावरील समस्येबाबत खा. सुप्रिया सुळेंचे ट्वीट

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले; अ‍ॅड. क्रांती राऊत (धोटे) यांच्या निवेदनाची दखल
Supriya Sule s tweet on Yavatmal railway station problems Ashwini Vaishnaw
Supriya Sule s tweet on Yavatmal railway station problems Ashwini Vaishnawsakal

यवतमाळ : यवतमाळ रेल्वेस्थानकावर अपुरा कर्मचारी वर्ग असून सोयीसुविधांचा अभाव आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने आरक्षण सुविधा, तिकीट बुकिंग, आगावू बुकिंगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. याचा त्रास नागरिकांना होतो. याकडे आपण लक्ष घालून प्रवाशांना योग्य सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांना टॅग करीत केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस अ‍ॅड. क्रांती राऊत (धोटे) यांनी दिलेल्या निवेदनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ दखल घेत रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले, हे विशेष.

अ‍ॅड. क्रांती राऊत (धोटे) यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई येथे तीन मे रोजी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी यवतमाळ रेल्वेस्थानकावरील समस्यांचे निवेदन दिले. यवतमाळ रेल्वेस्थानकावर सामान्य नागरिकांना अतिशय त्रास होत आहे. दोन दोन दिवस इंटरनेटची लिंक बंद राहते. त्यामुळे तिकीट आरक्षण करणे, आरक्षण रद्द करणे कठीण झाले आहे. या ठिकाणी एक खिडकी असून दोन महिला व एक पुरुष कर्मचारी कार्यरत आहे. संध्याकाळी आठपर्यंत एक महिला कर्मचारी उपस्थित असते. मात्र, या रेल्वेस्थानकावर कर्मचारी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकही रेल्वे पोलिस कर्मचारी नाही. प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी अशोकराव घारफळकर, वसंतराव घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील, लाला राऊत, तारिक लोखंडवाला, उत्तम गुल्हाने, हरीश चव्हाण, सतीश मानधना, कैलास कोरवते, सोनू उप्पलवार व योगेश धानोरकर आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com