Amravati News : चिखलदऱ्यात सहा लाखांची घरफोडी

Chikhaldara incident : ग्रामीण भागातसुद्धा धाडसी घरफोडीच्या घटना घडत आहेत. चिखलदरा परिसरात झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या घटनेमध्ये १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने व तीन लाखांची रोख रक्कम, असा सहा लाख २१ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
Amravati News
Amravati Newssakal
Updated on

चिखलदरा वॉर्ड क्रमांक (तीन) येथील दत्तपालसिंग गुलाबसिंग ठाकूर (वय ६७) यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. श्री. ठाकूर पती-पत्नी व भाचा, असे एकत्र राहतात. भाचा हा वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहे. दत्तपालसिंग ठाकूर हे पत्नीसह भंडारा येथे जात असताना त्यांना भाचा संशयित सचिन ऊर्फ सुलतान देवीसिंग चव्हाण (रा. धानोरा, भैसदेही) हा चिखलदरा येथे आल्याचे त्याने कळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com