esakal | सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!
sakal

बोलून बातमी शोधा

सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!

सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!

sakal_logo
By
तुषार अताकरे

वणी (जि. यवतमाळ) : येथील लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूलची विध्यार्थिनी स्वामीनी प्रशांत कुचनकार हिला शिक्षकदिनानिमित्त गडचिरोली पोलिसांनी एका दिवसासाठी डीआयजी होण्याचा मान दिला.

स्वामींनी ही येथील लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी आहे. लहान पणापासूनच ती प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. ती उत्कृष्ट भाषण देखील करते. नुकतीच तिने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रगट मुलाखत घेतली होती. शिक्षक दिनानिमित्त गडचिरोली विशेष पोलिस महानिरीक्षकचे (नागपूर कॅम्प) आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी स्वामींनीला एक दिवसाची डीआयजी बनविले.

तिला गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात कशा अडचणी असतात, नक्षलवाद म्हणजे काय? व भविष्यात नागरीसेवेत येण्यासाठी पहिल्या वर्गापासूनच पहिल्या पाच नंबरमध्ये येण्याची जिद्द निर्माण असायला हवी, असे मार्गदर्शन आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी केले. यासाठी स्वामींनीला मुख्याध्यापक प्रशांत गोडे व शिक्षिका मनीषा ठाकरेचे मार्गदर्शन लाभले.

loading image
go to top