Tadoba Safari Fees Hike: ताडोबा अंधारीतील पर्यटन सफारी महागली; पर्यटकांच्या खिशाला कात्री, १ ऑक्टोबरपासून लागू होणार दर
Tadoba Andhari: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे दर पुन्हा वाढले असून, १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होतील. त्यामुळे मध्यमवर्गीय पर्यटकांना ताडोबात सफारी करणे कठीण होईल.
नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे दर पुन्हा वाढले आहे. एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या निसर्ग पर्यटनापासून नवीन दर लागू होणार आहे. त्यामुळे ताडोबातील सफारी मध्यमवर्गांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.