esakal | पर्यटकांनो! आजपासून ताडोबा 'या' दिवसापर्यंत राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

tadoba tiger reserve

पर्यटकांनो! आजपासून ताडोबा 'या' दिवसापर्यंत राहणार बंद

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्याला पुन्हा एकदा कोरोनाचा फटका बसला आहे. ब्रेक द चेन अभियानाअंतर्गत राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागीलवर्षी काही महिने ताडोबा पर्यटन बंद होते. त्याचा मोठा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार करणाऱ्यांना बसला होता. आता स्थिती सुरळीत होत असतानाच पुन्हा पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - तूरसह हरभरा डाळीच्या दरात वाढ, साखरही महागणार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांसह अन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. ताडोबा बघण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर रिसोर्ट, हॉटेल, गाइड, जिप्सीचालक अवलंबून आहेत. मागील वर्षीही कोरोनामुळे पर्यटन काही महिने बंद होते. जवळपास सात-आठ महिन्यांनी ते सुरू करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यशासनाने गुरुवारपासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यात ताडोबाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - धक्कादायक! नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ १०० रेमडिसिव्हिर शिल्लक; रुग्णांचा जीव टांगणीला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि सर्व प्रकारच्या पर्यावरणीय पर्यटनाची सुविधा १५ ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आहे. ज्या पर्यटकांनी ताडोबा सफारीचे बुकींग केले. त्यांना बुकींगची रक्कम परत मिळणार आहे.

loading image
go to top