बाबासाहेबांचा देशातील सर्वांत उंच पुतळा हैदराबादेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नागपूर ः काही व्यक्ती इतिहासातल्या आहेत, परंतु त्या भूतकाळातल्या नाहीत. अशा महापुरुषांचा कधीच भूतकाळ होत नाही. म्हणूनच शेकडो वर्षानंतर त्यांचे स्मारक, त्यांचे पुतळे तयार होत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव अनुयायांच्या हृदयावर कोरून ठेवलं असल्यानेच त्यांच्या पुतळ्यातून मिळणारी ऊर्जा मनाला क्रांतीप्रवण ठेवते. याच प्रेरणेतून देशात सर्वाधिक उंच बाबासाहेबांचा पुतळा तयार करण्याचे श्रेय शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांना जाते. सर्वाधिक सात माळ्यांची इमारत असून तीन माळ्यांपेक्षा अधिक उंचीचा बाबासाहेबांचा पुतळा तयार करून हैदराबादेत उभारणारे सुपुत्र नागपूरचे आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा महासागर आहेत. बाबासाहेबांनी बुद्ध संस्कृती देशात पुन्हा रुजविली. या संस्कृतीला धरून असलेला पुतळा तयार करण्यासाठी 40 कलावंतांनी तब्बल सहा महिने काम केल्यानंतर बाबासाहेबांचा पुतळा तयार झाला.
पुतळा तयार करताना महापुरुषांचं चरित्र नजरेसमोर आणावं लागते. चरित्र नजरेसमोर आणलं की, त्या चरित्रातलं मर्म पुतळ्याच्या चेहऱ्यावर उमटते, तेव्हा खऱ्या अर्थाने शिल्पकाराला पुतळा तयार झाल्यानंतर समाधान मिळते. त्रिमितीमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे. "फ्री फायब्रीकेडेड' स्ट्रक्‍चरने इमारत तयार केली. यामुळे इमारतीमध्ये कमी वजनाचा असा पुतळा तयार करणे आवश्‍यक होते. फायबर रेन कोट मटेरियलचा पुतळा तयार केला असून "ब्रांझ मेटल' डार्क शेडमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला.
शिल्पकार प्रज्ञा मूर्ती मूळचे नागपूरचे. दिवंगत रवी मूर्ती यांचे ते सुपुत्र. प्रज्ञा मूर्ती यांनी आतापर्यंत 500 पेक्षा अधिक पुतळे तयार केले आहेत. देशातील सर्वच राज्यासह ऑस्ट्रेलिया व इतर देशातही बाबासाहेबांचे पुतळे प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केले. विशेष असे की, बुद्ध, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज, महात्मा फुले, लहू साळवे, बख्त बुलंद शहा यांचे पुतळे तयार केले आहेत.

बुद्धिस्ट आर्किटेक्‍चर कांबळे नागपूरचे
बुद्धिस्ट आर्किटेक्‍चरनुसार पुतळा तयार करण्यात आला. सात माळ्यांच्या इमारतीमध्ये तीन माळ्यांपेक्षा जास्त उंचीचा येथे बाबासाहेबांचा पुतळा स्थापित करण्यात आला. याची विशेषता अशी की, येथे संशोधनात्मक कार्य होणार असल्यामुळे प्रत्येक माळ्यावर बुद्धज्ञान कलेचा इतिहास कोरला आहे. पहिल्या माळ्यावर अजंठा, दुसऱ्या माळ्यावर सांची तिसऱ्या माळ्यावर नालंदा असा इतिहास येथे कोरला आहे. तर वरच्या माळ्यावर तेलंगणा येथील बुद्ध संस्कृतीसंदर्भातील वेबसाईटची माहिती असणार आहे. पुतळ्याची संकल्पना बुद्धिस्ट आर्किटेक्‍चर संदीप कांबळे यांची असून तेदेखील नागपूरचे आहेत. उपराजधानीतील शिल्पकार प्रज्ञा मूर्ती आणि आर्किटेक्‍चर संदीप कांबळे नागपूरचे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tallest statue of Baba Saheb is in Hyderabad